शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

जळगाव जिल्ह्यातील कापूस व्यापारी बाळू पाटील खून खटल्यात तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:20 IST

एरंडोल येथील कापसाचे व्यापारी बाळू रामू पाटील यांच्या खून प्रकरणात पप्पू उर्फ नागराज सुधाकर महाजन (वय २८ रा.जहांगीरपुरा, एरंडोल), सचिन आनंदा मराठे (वय ३४ रा.विद्या नगर, एरंडोल) व पंकज सुरेश धनगर (वय २८ रा. एरंडोल) या तिघांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल  दंडाची ५ लाख ६० रुपयाची रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश चार लाखाची सुपारी देऊन केला होता खून

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,५  : एरंडोल येथील कापसाचे व्यापारी बाळू रामू पाटील यांच्या खून प्रकरणात पप्पू उर्फ नागराज सुधाकर महाजन (वय २८ रा.जहांगीरपुरा, एरंडोल), सचिन आनंदा मराठे (वय ३४ रा.विद्या नगर, एरंडोल) व पंकज सुरेश धनगर (वय २८ रा. एरंडोल) या तिघांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, तिघांना वेगवेगळ्या प्रकारे ५ लाख ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून ही रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता, परिस्थितीजन्य पुराव्यावर ही शिक्षा सुनावण्यात आली, हेच या खटल्याचे वैशिष्ट आहे.अशी घडली घटनाबाळू पाटील ३० जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडे चार वाजता जेवण घरुन दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.आर.१०५२) घरुन बाहेर गेले होते.  तर २ फेब्रुवारी रोजी धरणगाव येथील माळी वाडा येथे पाटाच्या चारीत बाळू पाटील यांचे प्रेत  आढळून आले होते. मयताच्या गळ्यावर व शरीरावर जखमा असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दगडू पाटील यांच्या फिर्यादीवरुन एरंडोल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.बाळू पाटील व सचिन मराठे हे दोन्ही कापसाचे व्यापारी होते. त्या व्यवहारातून बाळू पाटील यांचे सचिनकडे २५ लाख रुपये घेणे होते. ही रक्कम देण्याची गरज भासू नये यासाठी सचिन याने बाळू पाटील यांचा खून करण्यासाठी पप्पू व पंकज या दोघांना ४ लाखाची सुपारी दिली.

असे कलम अशी शिक्षाकलम ३०२ अन्वये : नागराज महाजन व पंकज धनगर या दोघांना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदकलम १२० ब : नागराज महाजन, सचिन मराठे व पंकज धनगर या तिघांना जन्मठेप. नागराज व पंकज यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तर सचिन याला ५ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास दहा महिने साधी कैदकलम २०१ : नागराज व पंकज या दोघांना ५ वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदमयताच्या पत्नीला दंडाची रक्कम तिन्ही आरोपींना केलेल्या दंडाची रक्कम ५ लाख ६० हजार रुपये ही मयताची पत्नी पदमाबाई पाटील यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. घटनेच्यावेळी मयत बाळू पाटील यांचे वय ४२, पत्नी पद्माबाई यांचे वय ३५, मुलीचे १७ तर मुलाचे १५ असे होते. कुटुंबात कमविण्याचे कोणतेही साधन नसल्याने व आरोपींची परिस्थिती लक्षात घेता ही रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा