ॲड.प्रवीण चव्हाण यांचा ‘मुक्काम’ पुन्हा वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2023 18:42 IST2023-03-09T18:41:54+5:302023-03-09T18:42:38+5:30

न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होऊन शकली नाही.

   bail application of Adv. Praveen Chavan, who is in judicial custody, could not be heard in the court on Thursday  | ॲड.प्रवीण चव्हाण यांचा ‘मुक्काम’ पुन्हा वाढला!

ॲड.प्रवीण चव्हाण यांचा ‘मुक्काम’ पुन्हा वाढला!

कुंदन पाटील

जळगाव:  फसवणुक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होऊन शकली नाही. त्यामुळे ॲड.प्रवीण चव्हाण यांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे.
त्यांना दि.२६ फेब्रुवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. चव्हाण यांना तपासकामी पोलीस कोठडी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर केला होता.

त्यामुळे ॲड.चव्हाण यांनी  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर केलेला जामीन अर्ज मागे घेतला आणि जामिनासाठी सत्र न्यायालयात सादर केला होता.  या जामीनासह  पुनर्विलोकन अर्जावर गेल्या चार दिवसांपासून कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी या अर्जावर कामकाज होण्याची शक्यता आहे.

 

Web Title:    bail application of Adv. Praveen Chavan, who is in judicial custody, could not be heard in the court on Thursday