शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शेंदुर्णीत व्यवहार पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:47 PM

छेडछाड प्रकरणातील आरोपी जामिनावर

शेंदुर्णी, ता.जामनेर : महिलेची छेड काढल्यावरून तणाव निर्माण झालेल्या शेंदुर्णी येथे शनिवारी तिसऱ्या दिवशी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. या प्रकरणातील आरोपींना जामिना सोडण्यात आले.७ रोजी महिलेची छेड काढल्यावरून येथे दोन गटात हाणामारी झाली होती. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण होऊन ८ रोजीदेखील बाजारपेठ बंद होती. इतकेच नव्हे ग्रामस्थांनी पोलिसांविरोध रोष व्यक्त करीत तसे फलकही गावात लावले व ठिय्या आंदोलन केले होते.९ रोजी शेंदुर्णी बाजारपेठ, अत्यावश्यक सेवा, शाळा, महाविद्यालय, दैनंदिन व्यवहार सुरुझाले.या प्रकरणातील आरोपींना जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.पोलीस ठाण्याच्या मागणीकडे दुर्लक्षशेंदुर्णी हे जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी व्यापार पेठ असलेले गाव आहे. येथील व परिसरातील १४ गावातील लोकसंख्या पाहता शेंदुर्णीला पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे. वारंवार शांततेच्या बैठकीत केलेला तात्पुरता ठरावा कागदावरच राहतो. प्रत्यक्षात अंमलात येत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ व व्यापारी या बाबत संताप व्यक्त करतात. पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत शेंदुर्णी दूरक्षेत्र असून या क्षेत्राला सहाय्यक पोलीस निरीक्षक पद रिक्तच आहे. पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत या दूर क्षेत्राला दप्तरी कागदोपत्री दहा पोलिसांचा बंदोबस्त असला तरी काही न्यायालयीन कामासाठी व काही साप्ताहिक सुट्टी यामुळे प्रत्यक्षात चारच जण कार्यरत असतात. शांततेच्या बैठकीच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष, पत्रकार यांनी वारंवार सूचना देऊनदेखील गावाच्या शांततेकडे शासन, पोलीस अधिकारी दुर्लक्ष करतात असा आरोप ग्रामस्थांचा आहे. वारंवार अशा घटना घडल्यावर तात्काळ व्यापारपेठ बंद केली जाते. एवढेच नव्हे तर ज्या व्यापाºयाचा कोणत्याही वादाशी संबंध नसतानादेखील दरवेळेस दुकानांवर दगडफेक केली जाते. यातून मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पोलीस अधिकाºयांनी व शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून पुरेसे पोलीस कर्मचारी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापाºयांची आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव