आईला मारहाण केल्याने जळगावात मुलाचा पित्यावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:05 IST2018-06-12T21:05:07+5:302018-06-12T21:05:07+5:30
आईला मारहाण केल्याच्या कारणावरून अमोल गोकुळ मोरे या मुलाने पित्यावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घडली़

आईला मारहाण केल्याने जळगावात मुलाचा पित्यावर चाकू हल्ला
जळगाव- आईला मारहाण केल्याच्या कारणावरून अमोल गोकुळ मोरे या मुलाने पित्यावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घडली़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गोकुळ भोजू मोरे (वय-५६) हे पोलीस लाईन येथे वास्तव्यास आहेत़ मंगळवारी साडे दहा वाजता मुलगा अमोल हा घरी आला. आईला मारहाण केल्याच्या कारणावरून त्याने वडील गोेकुळ यांना मारहाण केली़ या दरम्यान त्याने चाकूने त्यांच्या हातापायावर वार केला़ त्यात गोकुळ मोरे हे जखमी झाले़ दरम्यान,त्यांनी दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला येऊन मुलाविरूध्द तक्रार दाखल केली़ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत़