प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणामवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:38 IST2019-09-23T19:38:02+5:302019-09-23T19:38:40+5:30
जळगाव - शहरातील प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांकडून पोस्टर बनवून जनजागृती करण्यात आली़ यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग ...

प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणामवर जनजागृती
जळगाव- शहरातील प्रगती विद्यामंदिरात मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांकडून पोस्टर बनवून जनजागृती करण्यात आली़ यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता़
मोबाईलच्या आती वापरामुळे नात्यातील आत्मीयता संपत चालली आहे. मनुष्याला विविध आजार जडत आहेत. तो त्याच स्वत:च काल्पनिक विश्व बनवून त्यात एकटा होत ,चालला आहे. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक मनोज भालेराव यांनी 'मोबाईलचे दुष्परिणाम' या विषयावर विदयार्थ्यांच्या साहाय्याने विविध जनजागृती विषयक चित्रे, घोष वाक्य तसेच माहिती लिहून पोस्टर्स बनवली आणि त्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोबाईलचा अतिवापर कमी करणे असा निश्चय विद्यार्थ्यांनाकडून करून घेतला. याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे, शिक्षक रमेश ससाणे, पंकज नन्नवरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.