शिधापत्रिकांची माहिती देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:42 IST2020-05-06T12:42:32+5:302020-05-06T12:42:47+5:30

ग्राहकांचा आरोप : अर्ज करूनही न्याय नाही

Avoid giving ration card information | शिधापत्रिकांची माहिती देण्यास टाळाटाळ

शिधापत्रिकांची माहिती देण्यास टाळाटाळ

ममुराबाद : गावातील रेशन दुकानांशी संबंधित केशरी शिधापत्रिकाधारकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोनवेळा अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याची तक्रार गावातील मुकेश बोरसे यांनी केली आहे.
बोरसे यांनी लोकशाही दिलेल्या अर्जानुसार, ममुराबाद गावातील केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या, त्यांची नावे व शिधापत्रिका क्रमांक, स्वस्त धान्य पुरवठा होत असलेल्या व नसलेल्या शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्यपुरवठा करणेबाबतचा शासनाचा नियम, आधार संलग्न असलेल्या व नसलेल्या शिधापत्रिका, कोणतीच सवलत मिळत नाही अशी शिधापत्रिकाधारकांची संख्या अशी माहिती मागितली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार कार्यालयातील जन माहिती अधिकाऱ्यांना शिधापत्रिकाधारकांची माहिती देण्याच्याबाबतीत आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Avoid giving ration card information