अडावदचा ग्रा.पं.सदस्य निघाला दुचाकी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:37 IST2018-10-10T12:36:09+5:302018-10-10T12:37:23+5:30

जळगाव शहरातून एकापाठोपाठ दुचाकी चोरी

Avadi's Gram Panchayat left a two-wheeler thief | अडावदचा ग्रा.पं.सदस्य निघाला दुचाकी चोर

अडावदचा ग्रा.पं.सदस्य निघाला दुचाकी चोर

ठळक मुद्दे२४ दुचाकींची कबुलीबनावट चावीचा वापर करुन दुचाकी लांबवित असल्याची माहिती

जळगाव : जळगाव शहरातून एकापाठोपाठ दुचाकी लांबविणारा चोरटा अडावद, ता.चोपडा येथील ग्रा.पं.चा सदस्यच निघाला आहे. जावेद खान हबीब खान असे त्याचे नाव आहे. त्याने बशीर अली समद अली रा.जळगाव) याच्यासोबत शहरातून तब्बल २४ दुचाकी चोरल्या आहेत. आतापर्यंत त्याने २१ दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत.
जळगाव शहरात दुचाकी चोरीचा सपाटाच लागल्याने पोलीस अधीक्षक डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी गुन्हे उघडकीस येत नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनीही आपल्या यंत्रणेला कामाला लावले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत जावेद खान हा बशीर अली समद अली बनावट चावीचा वापर करुन दुचाकी लांबवित असल्याची माहिती मिळाली होती.
२४ दुचाकींची कबुली
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १७ दुचाकी, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ व शहरच्या हद्दीतून २ दुचाकी चोरल्या आहेत. पाचोरा, अमळनेर येथूनही त्यांनी काही दुचाकी चोरल्या आहेत. यातील २१ दुचाकी पोलिसांनी सोमवारी रात्रीपर्यंत हस्तगत केल्या. दोघांनाही जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी व सहकाºयांनी या चोरट्यांचा पर्दाफाश केला.

Web Title: Avadi's Gram Panchayat left a two-wheeler thief