शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

'स्मार्ट सिटी'साठी वेधले संसदेचे लक्ष

By admin | Updated: March 4, 2015 15:20 IST

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न केले.

 जळगाव: केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. 'स्मार्ट सिटीत जळगावच्या समावेशाची शक्यता कमीच', 'राजकीय पाठपुराव्याची गरज' या मथळ्याखाली 'लोकमत'ने २ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून 'स्मार्ट सिटी'त देशात १00 शहरांची निवड केली जाणार आहे. त्यात शहरांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यात महाराष्ट्रातील निवडक ७-८ शहरांचा समावेश होणार आहेत. विकासासाठी जपान व अन्य राष्ट्रांचा निधी या शहरांना मिळणार असल्याने अनेक नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली आहे.क्रीडा क्षेत्रावर वेधले लक्ष'स्मार्ट सिटी'सह ग्रामीण क्षेत्रात क्रीडा प्रकाराला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारची काय योजना आहे व जळगाव जिल्ह्यात कबड्डी व कुस्तीसाठी लागणार्‍या साधन सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित करून खासदार ए.टी. पाटील यांनी संसदेचे लक्ष वेधले. त्यावर क्रीडा व युवा कार्यक्रम राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राजीव गांधी खेळ अभियानातून ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर थेट योजना राबविली जाणार आहे. तालुका स्तरावर आधुनिक सुविधा व क्रीडा मैदानांच्या विकासावरही खासदार पाटील यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.कबड्डीबाबत चर्चाकबड्डी व कुस्ती हे खेळ आंतरराष्ट्रीय असूनही ते विशिष्ट भागापुरतेच र्मयादित आहेत. जळगाव व उत्तर महाराष्ट्र हा भाग नेहमीच या खेळात अग्रेसर आहे. आपण स्वत: कबड्डीचे खेळाडू राहिलो आहे. त्यामुळे या खेळाकडे सरकारने अधिक लक्ष देण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली.