शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव राष्ट्रवादी महानगराध्यक्षांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, पाच लाखांची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 09:28 IST

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना एका महिलेचा मोबाईलवर कॉल आला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानुसार पाटील यांनी या महिलेला रिंगरोड कार्यालयात बोलविले होते.

जळगाव : एका राजकीय नेत्याला अडकवून ज्या पद्धतीने त्याचे अश्लिल फोटो व्हायरल करण्यात आले, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादीचे शहर महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्यासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेला पाच लाखांची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा सोमवारी करण्यात आला.

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना एका महिलेचा मोबाईलवर कॉल आला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानुसार पाटील यांनी या महिलेला रिंगरोड कार्यालयात बोलविले होते. याठिकाणी महिलेने आपल्याला अभिषेक पाटील यांना ‘हनी ट्रप’ मध्ये अडकविण्यासाठी कशी सुपारी दिली आहे, त्यात कोण सहभागी आहे, याबाबत माहिती दिली होती. त्याचा सविस्तर खुलासा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महारानगराध्यक्ष या नात्याने मनपातील व इतर अनेक गैरकारभार, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणले आहेत, त्यामुळे विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. हा अश्लाघ्य प्रकार त्याचाच भाग असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.

पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाईअभिषेक पाटील यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न फसला असला तरी संबंधित महिला व तिच्यामागे असलेल्या चेहºयांचा पर्दाफाश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी महानगर, युवक तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा पेठ पोलस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्याशी शिष्टमंडळाने तासभर चर्चा केली. त्यावर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झालेली आहे. आता जबाब व पुराव्याच्या आधारावर चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

अभिषेक पाटील यांचा तक्रार अर्ज तसेच जबाब व त्या महिलेचाही जबाब या कागदपत्रात आहे. सखोल तपास करुन कारवाई केली जाईल.- अकबर पटेल, पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ 

टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी