कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात जळगावला डंपरखाली आल्याने तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:09 IST2017-12-08T13:04:20+5:302017-12-08T13:09:02+5:30
जळगाव शहरातील कालिंका माता परिसरात कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कडगाव (ता.जळगाव) येथील भूषण पुरुषोत्तम सपकाळे (वय २४) या तरुण जागीच ठार झाला

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात जळगावला डंपरखाली आल्याने तरुण ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.८ : महामार्ग क्रमांक सहावर शहरातील कालिंका माता परिसरात कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कडगाव (ता.जळगाव) येथील भूषण पुरुषोत्तम सपकाळे (वय २४) या तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना शुक्रवार, ९ रोजी सकाळी ८ वाजता घडली.
शुक्रवारी भूषण हा त्याच्या मित्रासह दुचाकीने सकाळी ८ वाजता जात होता. या दरम्यान कालंका माता परिसरात त्याच्या वाहनासमोर कुत्रे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि मागून येणाºया डंपरखाली तो सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मित्र जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी ग्रामस्थांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबांनी प्रचंड आक्रोश केला. तो मन हेलावणारा होता. राष्टÑीय महामार्गावर गेल्या आठवड्यात अजिंठा चौफुलीवर दोन जणांचा मृत्यू झाला होता. अपघातांची मालिका सुरुच आहे.