शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

जळगावातील तरुणीला दहशतवादी बनविण्याचा प्रयत्न - आईची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:53 AM

८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्दे मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेऊन घटनाक्रम केला कथन

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - प्रेम प्रकरणातून पळवून नेलेल्या मुलीला जबरदस्तीने दहशतवादी करण्याचा प्रयत्न केला गेला, तिने नकार दिला असता तिचा खून करुन मृत शरीराची विल्हेवाट लावल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार ८ जणांविरुध्द खून, खोटे दस्ताऐवज व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीला पळवून नेल्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी पीडित मुलीच्या आईने न्यायालयात धाव घेऊन घटनाक्रम कथन केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणात १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश रामानंद नगर पोलिसांना दिले आहेत.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार,शेख वसीम शेख अहमद (रा.दंगलग्रस्त कॉलनी, जळगाव) याने ७ जून २०१७ रोजी शहरातील एका २१ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. त्यानंतर शेख अहमद शेख गुलाब , शकीराबी शेख अहमद , शेख इम्रान शेख अहमद , शेख अब्दुल शेख अजीज, सईद अब्दुल अजीज शेख व सोहेल खान अब्दुल खान अय्युब खान यांनी कट रचून मुलीला पळवून लावले तर शेख वसीम याने तिच्याशी लग्न करुन दहशतवादी कार्यात सहभागी करण्याचा प्रयत्न केला. तिने या कृत्यास नकार दिल्याने त्यांनी तिचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली.काझी मोहम्मद इस्लमा (रा.बांद्रा, मुंबई) याने धर्मांतर केल्याबाबतचे खोटे दस्ताऐवज केले. २७ आॅगस्ट २०१७ नंतर हे सर्व कारस्थान झाले आहे. त्यानुसार या आठ जणांविरुध्द कलम ३०२, २०१ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा