शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

पोलिसांवरील हल्ला, आरोपांच्या घटनांनी खाकी डागाळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:27 IST

खरच पोलीस चुकतायं का?, आत्मपरीक्षण करण्याची गरज

सुनील पाटील जळगाव : गेल्या महिनाभरात पोलिसांवर आरोप असो कि थेट हल्ला यामुळे खाकी नक्कीच डागाळली गेली. प्रत्येक घटनांचा बारकाईने अभ्यास केला तर कुठे ना कुठे पाणी मुरतय..काही घटना पाहता खरच पोलीस चुकताय का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. परिस्थितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांंची बदलणारी भूमिका देखील घातक ठरत आहे.गेल्या महिन्यात पोलिसांना आव्हान देणारी घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. सर्वत्र वाळू बंदी असतानाही शहरातून बिनधास्तपणे वाळूची डंपर व ट्रॅक्टर वापरत आहेत.पोलीस, आरटीओ व महसूल या तिनही यंत्रणांची जबाबदारी असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. आकाशवाणी चौकात वाळू वाहतूक करणारे डंपर अडविले म्हणून वाळूमाफियांनी थेट महामार्गावरच ठिय्या मांडला, त्याही पुढे जावून वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनाच मुख्यालयात जमा करण्याची धमकी देण्यात आली. आधीच चुकीचे काम, त्यावर कारवाई करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच दम भरला जातो. याठिकाणी नेमके कोणाचे चुकले, कारवाई करणे वाळूमाफियांना का झोंबले. पोलिसांशी हुज्जत घालण्याची हिंमत का आली?, एक दिवस उशिराने का गुन्हा दाखल झाला? या प्रश्नांची उत्तरे वाळूमाफिया व पोलीस हेच देऊ शकतील.या घटना पाहता नागरिकांचा पोलिसांवर रोष आहे की? पोलिसांकडून काही चुका होत आहेत.पोलिसाची कॉलर पकडलीदुचाकीवरुन तीन सीट जाणाºया तरुणांना हटकले असता त्यातील एकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून थेट कॉलर पकडली. येथेही कारवाई करण्याच्या कारणावरुनच वादाची ठिणगी पडली. या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला, मात्र सामान्य व्यक्तीची पोलिसाची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेलीच कशी? त्यामागे नेमके काय कारण आहे?, हा प्रकार ताजा असतानाच पोलीस अधीक्षकांनी महामार्गावर ट्रक अडविणाºया पोलिसाला मुख्यालयात जमा केले.वाहतूक पोलीसच सर्वाधिक टार्गेट झाल्याचे प्रकरणे घडली आहेत.कैदी बंदोबस्त नोकरी जिकरीचीकैदी बंदोबस्त ड्युटी करणे जिकरीची व तारेवरची कसरत झालेली आहे. गेल्या आठवड्यात २३ फेब्रुवारी रोजी खुनातील गुन्ह्यातील आरोपीने दोन पोलिसांना चावा घेतला. या आरोपीने अक्षरश: रुग्णालय डोक्यावर घेतले. काही दोष नसलेल्या पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला.गुन्हेगार पोलिसांवरच वरचढ कसे ठरतात हे त्याचे उदाहरण आहे. ठाणे जिल्ह्यातील दिंडोशी मार्गावरही पोलीस व्हॅनमध्ये आरोपीने पोलिसांना अक्षरश: खालच्या पातळीवर जावून शिवीगाळ केली व अंगावर थुंकला. हा व्हीडीओ राज्यभर व्हायरल झाला.अधिकाºयांची सोयीनुसार बदलते भूमिकापोलिसांवर हल्ला असो की आरोप, अशा प्रकरणांमध्ये अधिकाºयांची सोयीनुसार भूमिका बदललेली पोलिसांनी पाहिली आहे. आपल्या अंगावर शेकायला लागले की कर्मचाºयांवर ढकलून मोकळे व्हायचे. मलई सर्वांनीच खायची तर मग शिक्षा एकालाच का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पालकाला सर्व पाल्य एकसारखेच असतात, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पालक या नात्यानेच आपली भूमिका निभावणे गरजेचे आहे?, अन्यथा पालकावरचाच विश्वास उडाल्यासारखे होईल.अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना कामाच्या ठिकाणी त्रास होतो, मात्र अशा वेळी अधिकारी बाजू घेत नाही, मोजक्याच कर्मचाºयांची बाजु घेतली जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.पोलिसांवरील हल्ला व आरोपांच्या काही लक्षवेधी घटना२ फेबु्वारी : कंजरवाड्यात पोलिसांच्या बैठकीत तरुणाने गोंधळ घातला.९ फेब्रुवारी : वाळूमाफियांनी वाहतूक पोलिसांच्याविरोधात महामार्ग रोखला२३ फेब्रुवारी : खुनातील आरोपीने घेतला पोलिसांना चावा२५ फेब्रुवारी : जिल्हा रुग्णालयात पोलिसाच्या कानशिलात लगावली२५ फेब्रुवारी : आकाशवाणी चौकात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली२९ फेब्रवारी : शनी पेठ पोलीस ठाण्यातच गोंधळ आणि पोलिसांवर आरोप

टॅग्स :Jalgaonजळगाव