प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने भावंडांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:18 IST2021-01-13T13:44:53+5:302021-01-13T14:18:09+5:30

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून मेहूणबारे येथे तरुणाने १८ वर्षीय तरुणीवर व तिच्या भावावर चाकूने

Attack on siblings for refusing to have a love affair | प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने भावंडांवर हल्ला

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने भावंडांवर हल्ला

ठळक मुद्देतरूणाविरुध्द गुन्हा दाखल.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून मेहूणबारे येथे तरुणाने १८ वर्षीय तरुणीवर व तिच्या भावावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरूणीचा भाऊही जखमी झाला आहे. भाऊ-बहिणीवर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत चौधरी (मेहूणबारे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहूणबारे येथील तरूणी आई-वडिल व भावासह राहते. ८-१० वर्षापूर्वी तिच्या घरासामोर राहणारा प्रशांत आधार चौधरी याच्याशी तिची ओळख झाली. या ओळखीतून त्याने तरुणीला प्रेमसंबंध ठेवण्याची विनंती केली. मात्र तरुणीने नकार देताच तो वारंवार त्रास देवू लागला. हा प्रकार तिने आई वडिलांमार्फत प्रशांतच्या आई वडिलांना सांगितला. झाल्या प्रकाराची त्यांनी माफी मागून प्रशांत यास बाहेरगावी पाठवून दिले होते. मात्र ७ जानेवारी रोजी पीडित तरुणीच्या आईच्या मोबाईलवरून प्रशांतने तरुणीशी संवाद साधून माझे लग्न ठरले असून मला तुला शेवटचे भेटायचे आहे, यानंतर तुला भेटणार नाही, असे सांगितले.

तरुणीने त्यास नकार दिला असता ११ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पीडित तरुणी घरात असताना प्रशांत हा घरात घुसला व त्याने शिवीगाळ करीत हातातील चाकू तरुणीच्या हातावर मारला. तो वाचवण्याच्या प्रयत्नात चाकू तरूणीच्या कपाळाला लागला. तिला वाचवण्यासाठी तरुणीचा भाऊ धावत आला असता या धावपळीत पीडित तरुणीच्या मांडीला व भावाच्या बोटाला चाकू लागला. पीडितेचे आईवडिल धावत आले असता प्रशांत हा घरातून पळून गेला.

Web Title: Attack on siblings for refusing to have a love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.