माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 22:32 IST2021-01-09T22:31:49+5:302021-01-09T22:32:13+5:30
माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघां आरोपींना शनिवारी दुपारी पोलीसांनी अटक केली आहे.

माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ला, तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघां आरोपींना शनिवारी दुपारी पोलीसांनी अटक केली आहे. यात जगदीश महाजन, विशाल महाजन व संजय घटी या तिघांचा समावेश आहे.
दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता कामे आटोपून सावरकर चौकात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी उभे असताना त्याचवेळी जगदीश महाजन व विशाल महाजन हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांची मोटारसायकल स्लीप झाली. यावेळी जगदीश महाजन व विशाल महाजन यांनी आम्हाला पाहून हसतोय का ? अशी विचारणा करीत विशाल महाजन याने प्रभाकर चौधरी यांनी पकडून ठेवले.
जगदीश महाजन याने त्यांच्या पोटावर धारदार चाकूने वार केल्याची घटना घडली होती. यात चौधरी यांच्या पोटावर गंभीर जखम झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री पोलीसांनी औरंगाबाद येथे रुग्णालयात जावून जखमी प्रभाकर चौधरी यांचा जबाब घेतल्यानंतर रात्री उशिरा शहर पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.