१५ हजाराची लाच मागणाऱ्या आश्रमशाळा मुख्याध्यापकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 19:40 IST2018-12-21T19:40:27+5:302018-12-21T19:40:54+5:30
तक्रारदार हे गंगापुरी आश्रमशाळेत मटण पुरवितात.

१५ हजाराची लाच मागणाऱ्या आश्रमशाळा मुख्याध्यापकास अटक
जळगाव : आश्रमशाळेत साहित्य पुरवठ्याचे बिल बँकेत जमा करण्याच्या मोबदल्यात १५ हजाराची लाच मागणाऱ्या गंगापुरी (ता. जामनेर) येथील शासकीय आश्रमशाळेचा मुख्याध्यापक शांताराम सोनू सोनवणे (५०, रा. शिवकॉलनी, जामनेर) यास अटक करण्यात आली आहे. २१ रोजी ही घटना घडली.
तक्रारदार हे गंगापुरी आश्रमशाळेत मटण पुरवितात. त्याचे बिल बँकेत जमा करण्याच्या मोबादल्यात सोनवणे याने १५ हजाराची लाच मागितली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे याला लागलीच अटक करण्यात आली.