अरुण चांगरे यांचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:01 IST2020-01-22T13:00:52+5:302020-01-22T13:01:06+5:30
जळगाव : अखिल भारतीय मजदूर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेवक अरुण चांगरे यांचे मंगळवारी पहाटे ३ वाजता मनमाड येथून ...

अरुण चांगरे यांचे हृदयविकाराने निधन
जळगाव : अखिल भारतीय मजदूर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेवक अरुण चांगरे यांचे मंगळवारी पहाटे ३ वाजता मनमाड येथून येत असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
अरुण चांगरे सोमवारी दुपारी मनमाड येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. रात्री लग्न आटोपून ते स्टेशनवर आले. गाडीची वाट पहात असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना लगेच रूग्णालयात दाखल केले. तेथून गाडीने रात्री २ वाजेच्या सुमारास मालेगाव येथे रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. चांगरे हे तत्कालीन नगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी अडीच वर्षे आरोग्य सभापती म्हणून देखील काम पाहिले होते. शासनाकडून त्यांचा दलितमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.