अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:00+5:302021-09-19T04:17:00+5:30
जळगाव : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गोपीचंद गोविंदा भिल ...

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यास अटक
जळगाव : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गोपीचंद गोविंदा भिल (१८, रा.टाकरखेडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सतरा वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवार, दि.१४ रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संशयित हा अहमदनगर येथे असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अहमदनगर, शिर्डी व नंतर धुळे येथे संशयिताचा शोध घेतला; मात्र ते मिळून आले नाही, परंतु संशयित हा धुळ्याकडून जळगावकडे जात असल्याची माहिती मिळताच, पाळधी येथून संशयित गोपीचंद भिल याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई एपीआय संदीप परदेशी, स्वाती पाटील, संदीप महाजन आदींनी केली आहे.