जळगावात वीज अभियंत्याला १२ हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:40 IST2018-06-21T13:40:32+5:302018-06-21T13:40:32+5:30
वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण परिसरात रंगेहाथ पकडले.

जळगावात वीज अभियंत्याला १२ हजारांची लाच घेताना अटक
जळगाव : वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण परिसरात रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचे वीज मीटरचे सील तुटलेले होते. महावितरणचे सहायक अभियंता संदीप बडगुजर यांनी या मीटरचा पंचनामा केला होता. त्यानुसार २०१५ पासून आतापर्यंत ४० ते ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे बडगुजर यांनी तक्रारदाराला सांगितले. हा दंड टाळायचा असेल तर १५ हजाराची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तक्रार केली. ठाकूर यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. पथकाने बुधवारी सायंकाळी मेहरुणमधील एका गोदामाजवळ सापळा लावला. बडगुजर यांना १२ हजार रुपये स्विकारतांना पथकाने रंगेहाथ पकडले.