ठळक मुद्देजि.प.शाळेत निवारा अन् जेवणाची व्यवस्थानगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केली प्रशासनाशी चर्चा
धरणगाव, जि.जळगाव : शहरातील उड्डाण पुलाखाली राहत असलेले उतारू व भिकाऱ्यांसाठी येथील जि.प.शाळेत निवारा केंद्र करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.येथील उड्डाण पुलाखाली बहुसंख्येने उतारू व भिक्षुक राहत होते. लॉकडाऊन असल्याने त्यांचे हाल होत असल्याने नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी त्यांची शिवसेनेतर्फे जेवणाची व्यवस्था केली होती.४ रोजी चौधरी यांनी तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाच्या माध्यमातून उतारू व भिकाºयांंसाठी मराठी शाळा क्रमांक एकमध्ये निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. त्यांची राहण्याची व दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था केल्याने त्यांच्या चेहºयावर तूर्त हास्य फुलले आहे.