शिकाऊ उमेदवारांना आजपासून करता येणार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:05+5:302021-09-13T04:17:05+5:30
जळगाव : शिकाऊ उमेदवारांची १११ व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे ऑनलाईन अर्ज १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२१ या ...

शिकाऊ उमेदवारांना आजपासून करता येणार अर्ज
जळगाव : शिकाऊ उमेदवारांची १११ व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे ऑनलाईन अर्ज १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत भरावयाचे आहेत. प्रत्यक्ष परीक्षा १३ ते १६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होईल, असे मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्यांनी कळविले आहे.
२१ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत
जळगाव : जळगाव टपाल विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयी तक्रारी समजून घेण्यासाठी डाक अधीक्षक कार्यालयात २१ सप्टेंबरला दुपारी चार वाजता पेन्शन अदालत आयोजित केली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक डॉ. बी. एच. नागरगो यांनी केले आहे.
आज विभागीय लोकशाही दिन
जळगाव : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभागप्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचे उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर यांनी कळविले आहे.