ज्येष्ठांना सुविधा देणारी यंत्रणा राबवावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:04 IST2019-04-08T15:03:49+5:302019-04-08T15:04:35+5:30
मतदारांशी थेट संवाद

ज्येष्ठांना सुविधा देणारी यंत्रणा राबवावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा
सेवानिवृत्तांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे सेवानिवृत्तांसाठी व्यासपीठ
सर्वसामान्यांना मुलभुत सुविधा चांगल्या द्याव्यात
कुणाचेही सरकार निवडुन येवो, सर्व सामान्य व्यक्तीला त्या सरकारकडुन रस्ते, पाणी, आरोग्य , स्वच्छता व इतर विकासकामांच्या माध्यमातून प्रभागात सुविधा मिळाव्यात, हीच अपेक्षा असते. आमच्या प्रभागात परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे रस्त्यावरुन चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ््यात तर अतिशय दुरवस्था होऊन, मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते, यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. या स्थानिक मुद्दयांना अनुसरुन लोकसभेला उभ्या असलेल्या उमेदवारांकडुन माझ्या अपेक्षा आहेत.
-किशोर सुर्वे, सेवानिवृत्त अधिकारी,
स्टेट बँक आॅफ इंडिया, जळगाव
ज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावी
शासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.
-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.

शिक्षक भरती सुरू करावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा
आज शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध असल्या तरी रोजगार संधी मात्र कमी आहेत. तरी सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावेत. गेल्या काही वर्षांपासून बंद ठेवलेली शिक्षक भरती सुरु करावी. सध्या युवकांना कंत्राटपद्धतीवर नोकºया दिल्या जातात. मात्र कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्यांना न देता, कायम स्वरुपी नोकºया द्याव्यात. तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने सर्व त्या उपाययोजना करायला हव्यात, त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. ऐवढीच अपेक्षा ज्येष्ठ मतदार म्हणुन निवडणुकीला उभ्या उमेदवारांकडुन आहे.
-पी. डी. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल.