दुचाकी अपघातातील दुसऱ्या जखमी तरुणाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:38 IST2020-08-06T13:38:03+5:302020-08-06T13:38:18+5:30
जळगाव : शिरसोली ते जळगाव दरम्यान दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातातील जखमी ललित अशोक अस्वार (२३, शिरसोली प्र.न) या ...

दुचाकी अपघातातील दुसऱ्या जखमी तरुणाचाही मृत्यू
जळगाव: शिरसोली ते जळगाव दरम्यान दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातातील जखमी ललित अशोक अस्वार (२३, शिरसोली प्र.न) या तरुणाचा बुधवारी रात्री उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याआधी याच अपघातात जखमी झालेल्या पवन चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला होता. २७ जुलै रोजी ललित हा दुचाकीने जळगावला जात असताना ललित व समोरुन येणाºया दुचाकीची पवनची दुचाकी एकमेकावर धडकली होती. या अपघातात तीन जखमी झाले होते. पवन चौधरी याचा चार दिवसात मृत्यू झाला होता. दरम्यान, त्या दिवसापासून ललित ह ादेखील मृत्यूशी झुंज देत होता. बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली ललित हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई सरलाबाई,वडील अशोक तुकाराम बारी, भाऊ विजय व विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान ललित याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी पुढाकार घेऊन मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली.