जळगावात आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:35 IST2020-04-23T12:35:24+5:302020-04-23T12:35:49+5:30
एकूण रुग्ण संख्या सहावर

जळगावात आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
जळगाव : येथील ७३ वर्षीय पुरूषाचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली. यामुळे आता जळगावात कोरोना रुग्णाची संख्या सहावर पोहचली आहे. यातील दोघांचा या पूर्वीच मृत्यू झाला आहे.