शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

संत मुक्ताबाई संस्थानचा वार्षिक कीर्तन महोत्सव कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 2:33 PM

संत मुक्ताबाई संस्थानचा वार्षिक कीर्तन महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर : वारकरी संप्रदायातील भाविकांकरिता विशेष पर्वणी ठरणारा संत मुक्ताबाई संस्थान कोथळी - मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील १७ ते २४ फेब्रुवारी दरम्यान साजरा होणारा देगलुरकर फडाचा कीर्तन सप्ताह महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.श्रीसंत मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर समाधीस्थळावर दरवर्षी वारकरी संप्रदायातील प्रख्यात जेष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, फडकरी यांच्या सहभागातून राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन संत मुक्ताबाई संस्थान करीत असते. या महोत्सवात राज्यातील हजारो भाविक उपस्थित असतात ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, भजनास नामवंत गुणीजन सेवा देतात. यावर्षी १७ ते २४ फेब्रुवारीपर्यंत देगलुरकर फडाच्या सहभागातून चैतन्य महाराज देगलुरकर यांचे ताटीचे अभंग निरूपण, ज्ञानेश्वरी पारायण व जयवंत महाराज बोधले, प्रमोद अण्णा जगताप, माधवदास महाराज राठी, चंद्रशेखर महाराज देगलुरकर, महादेव महाराज राऊत आदींची कीर्तने आयोजित केली होती. आठ दिवस भाविकांना भरगच्च आध्यात्मिक मेजवानीच ठरणारी होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे, विनायकराव पाटील, उध्दव महाराज जुनारे, विलास संत यांनी पंढरपूर येथे चैतन्य महाराज देगलुरकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. यावर्षीचा कार्यक्रम रद्द करून पुढील वर्षांत २०२२ मध्ये सप्ताह महोत्सव करण्याचे ठरले आहे. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातच हा भव्यदिव्य कार्यक्रम साजरा होणार असल्याने भाविकांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.
टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर