अनिश शहा ‘क्रेडाई’च्या राज्य सहसचिवपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:40 PM2019-04-03T12:40:08+5:302019-04-03T12:40:49+5:30

पुणे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत निवड

Anish Shah is the state joint secretary of CREDAI | अनिश शहा ‘क्रेडाई’च्या राज्य सहसचिवपदी

अनिश शहा ‘क्रेडाई’च्या राज्य सहसचिवपदी

googlenewsNext

जळगाव : बांधकाम व्यावसायिकांची राज्यातील शिखर संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ महाराष्ट्रच्या सहसचिवपदी जळगाव येथील अनिश शाह यांची निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून ती निवड दोन वर्षांसाठी आहे.
‘क्रेडाई’ नॅशनलचे चेअरमन गीतांबर आंनद, नॅशनल प्रेसिडेंट सतीश मगर, मावळते नॅशनल अध्यक्ष जक्षय शहा, महाराष्ट्रचे मावळते अध्यक्ष शांतीलाल कटारिया बैठकीस उपस्थित होते. यात अध्यक्ष म्हणून राजीव पारेख यांची निवड होण्यासह सतीश मगर यांनी जळगावचे अनिश शाह यांची राज्याचे सहसचिव म्हणून निवड जाहीर केली. शाह यांनी २०१७ ते २०१९ या काळात राज्याचे व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

Web Title: Anish Shah is the state joint secretary of CREDAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव