जनावरांची चोरी करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 20:58 IST2020-12-16T20:58:46+5:302020-12-16T20:58:59+5:30
जळगाव : मेहरुण शिवारातून जनावरांची चोरी करुन ते चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (५१,रा.पाळधी, ता.धरणगाव) ...

जनावरांची चोरी करणाऱ्याला अटक
जळगाव : मेहरुण शिवारातून जनावरांची चोरी करुन ते चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (५१,रा.पाळधी, ता.धरणगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.
शेख अजगर याने वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी (रा.मालेगाव) व शेख मुजाहिद शेख जाबीर कुरेशी (रा.मासुमावडी) या दोघांच्या मदतीने २१ व ३० ऑगस्ट, २५ व २६ सप्टेबर रोजी दारा इकबाल पिरजादे (रा.मेहरुण) यांच्या मालकीचे तीन जणावरे चोरुन ती कारमधून (क्र.एम.एच.०१ बी.टी.४२५५) वाहतूक करुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद व सचिन पाटील यांच्या पथकाने शेख अजगर याला पाळधी येथून अटक केली. त्याच्याविरुध्द अशाच प्रकारे धरणगाव, रामानंद नगर, चोपडा शहर व भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील दोन जण अजूनही फरार आहेत.