अनिल भवारी शहर, तर रंगनाथ धारबळे शनी पेठचे ठाणेदार

By विलास.बारी | Updated: August 5, 2023 23:44 IST2023-08-05T23:44:31+5:302023-08-05T23:44:41+5:30

नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले.

Anil Bhawari town, while Ranganath Dharbale Thanedar of Shani Peth | अनिल भवारी शहर, तर रंगनाथ धारबळे शनी पेठचे ठाणेदार

अनिल भवारी शहर, तर रंगनाथ धारबळे शनी पेठचे ठाणेदार

जळगाव : जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले. त्यांना तत्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक सचिन सानप यांची पहूर पोलिस ठाणे, विशाल जयस्वाल यांची जिल्हा पेठ पोलिस ठाणे, बबन जगताप यांची सायबर पोलिस ठाणे, सुनील पवार यांची पारोळा पोलिस ठाणे, अनिल भवारी यांची जळगाव शहर पोलिस ठाणे, तर जिल्हा पेठचे प्रभारी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ, जिविशा शाखेतील रंगनाथ धाडबळे यांची शनी पेठ पोलिस ठाणे, भुसावळ तालुक्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांची जिविशा, तर वाचक शाखेतील सपोनि रूपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

Web Title: Anil Bhawari town, while Ranganath Dharbale Thanedar of Shani Peth

टॅग्स :Jalgaonजळगाव