चोपडा येथील अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:59 IST2019-07-30T19:58:54+5:302019-07-30T19:59:56+5:30
चोपडा : येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे मानधन, निवृत्त मदतनीसांचे वेतन तसेच ग्राम पंचायत कर्मचाºयांना तीन महिन्यांपासून वेचतन रखडले आहे. ...

चोपडा येथील अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले
चोपडा : येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे मानधन, निवृत्त मदतनीसांचे वेतन तसेच ग्राम पंचायत कर्मचाºयांना तीन महिन्यांपासून वेचतन रखडले आहे. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
अंगणवाडी महिला कर्मचाºयांचे मानधन दोन महिन्यांपासून मिळाले नाही. जिल्ह्यातील शंभरावर सेविका व मदतनीस निवृत्त झाल्या आहेत. त्यांना पेन्शन नाही म्हणून सेवानिवृत्ती लाभ अनुक्रमे १ लाख व ७५ हजार रू मिळतो. ती रक्कम वर्षभरापूर्वीपासून मिळालेली नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाºयांना तीन महिन्यांपासून शासनाने पगार दिलेले नाहीत. आनलाईनमुळे महिन्याच्या १ तारखेलाच पगार होतील, अशा वल्गना सरकारने केल्या होत्या. पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.
पूर्वी जिल्हा बँकेमार्फत पगार मिळत होते. आता पूर्वीपेक्षा अदिक गैरसोय होत आहे. आशा कर्मचाºयांना चार महिन्यांपासून मोबदला नाही. जेमतेम दोन ते तीन हजारांवर घर चालवणाºया आशांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे.