संपूर्ण दारुबंदीसाठी महिला शक्तीचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:14 PM2017-08-30T17:14:36+5:302017-08-30T17:21:10+5:30

संपूर्ण दारुबंदीसाठी वाघोदा येथील महिला भुसावळात ट्रकने झाल्या दाखल. यावलला अधिका:यांना घेराव.

..and this is the power of the woman's power | संपूर्ण दारुबंदीसाठी महिला शक्तीचा रुद्रावतार

संपूर्ण दारुबंदीसाठी महिला शक्तीचा रुद्रावतार

Next
ठळक मुद्देसंपूर्ण दारूबंदीच्या मागणीसाठी वाघोदा येथील महिला ट्रकने भुसावळात दाखलभुसावळ तालुक्यातील वांजोळा व मिरगव्हाण येथील संतप्त महिलांनी घेतली सहाय्यक पोलीस अधीक्षकांची भेटहिंगोणा येथील महिलांनी घातला यावल येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांना घेराव

ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.30 - भुसावळ तालुक्यातील वांजोळा,  मिरगव्हाण, यावल तालुक्यातील हिंगोणा व रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील महिलांनी मंगळवारी दुपारी रुद्रावतार धारण करीत संपूर्ण दारुबंदीसाठी प्रशासनाला निवेदन दिले. यावल येथे महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांना घेराव घालण्यात आला.
भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील संतप्त महिलांनी सकाळी 11 वाजता भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन गावातील गावठी दारुबंद करण्याची मागणी केली. निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाही त्यांनी निवेदन देऊन दारुबंदी झालीच पाहिजे यासाठी आग्रह धरला. रावेर तालुक्यातील वाघोदा येथील ट्रकभर महिलांनी भुसावळातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात येत दारुबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला. यावल तालुक्यातील हिंगोणा  येथील महिलांनी यावल येथील राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या अधिका:यांना घेराव घालून संपूर्ण दारुबंदीची मागणी केली.
वांजोळा व मिरगव्हाणच्या महिलांचा संताप 
भुसावळ तालुक्यातील वांजोळे व मिरगव्हाण येथील  महिलांनी अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्याकडे केली. तसे निवेदन दिले.

वाघोदा येथे महिलांचा रुद्रावतार
रावेर तालुक्यातील वाघोदा बु.।। येथील महिला गावातील अवैध दारु बंद करण्याच्या मागणीसाठी भुसावळ येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात दुपारी दाखल झाल्या. दारुबंदी विभागातील कर्मचा:यांची धावपळ उडाली. वाघोदा बु.।। ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेत एकमताने गावातील अवैध दारु विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला गावातील अवैध दारु विक्री बंद करण्याची महिलांनी मागणी केली होती. परंतु अवैध दारु विक्री बंद होत नसल्याने अखेर महिलांनी संघटीत होऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भुसावळ कार्यालय गाठत अधिका:यांना निवेदन दिले.
 

Web Title: ..and this is the power of the woman's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.