पारोळ्यात अनंतनाथांची पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:28 IST2019-09-15T23:28:20+5:302019-09-15T23:28:25+5:30
पारोळा : येथील दिगंबर जैन समाजाचे पर्युशन महापर्व व अनंत चौदसनिमित्त भगवान अनंतनाथजी यांच्या पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ...

पारोळ्यात अनंतनाथांची पालखी मिरवणूक
पारोळा : येथील दिगंबर जैन समाजाचे पर्युशन महापर्व व अनंत चौदसनिमित्त भगवान अनंतनाथजी यांच्या पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
१५ रोजी सकाळी मंदिरात भगवान प्रतिमेचा अभिषेक करून प्रतिमा सजविलेल्या पालखीत विराजमान केली. हत्ती गल्लीतील पार्श्वनाथ चौक येथून सकाळी ९ वाजता पालखी मिरवणुकीस वाजतगाजत सुरुवात झाली.
बहिराम गल्ली, गणपती चौक, बालाजी चौक, रथ चौक, गाव होळी चौक, गुजराथी गल्ली, लवन गल्लीतून पालखी मंदिरात विराजमान केली. ठिकठिकाणी मुनिश्री १०८ अक्षयसागरजी महाराज, मुनिश्री १०८ नेमिसागरजी महाराज, शुल्लक श्री १०५ समताभूषण महाराज यांचे पादप्रक्षालण करण्यात आले.