एरंडोल : जळगाव जिल्हा प्रांतिक तैलिक महासभेच्या युवा कार्याध्यक्षपदी एरंडोल येथील युवा कार्यकर्ते आनंदा रामदास चौधरी उर्फ भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तैलिक महासभेच्या युवा आघाडीचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय पोपटराव चौधरी यांनी केली आहे.तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष आर.टी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. आनंदा रामदास चौधरी हे यापूर्वी एरंडोल येथील साई गजानन रिक्षा युनियनचे अध्यक्ष, एरंडोल तालुका तेली पंचमंडळाचे सचिव, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते व उत्तम वक्ता आहे. या नियुक्तीबाबत आमदार चिमणराव पाटील, रामदास तडस, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष व भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, जिल्हा बँक संचालक अमोल चिमणराव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, शिवसेना नेते रमेश महाजन, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, तालुका शिवसेनाप्रमुख वासुदेव पाटील, जहांगीरपुरा तेली समाजाध्यक्ष गुलाब चौधरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आनंदा चौधरी म्हणाले, माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू व जिल्ह्यामध्ये संघटना सर्वांना सोबत घेऊन मजबूत करू.
जळगाव जिल्हा प्रांतिक तैलिक महासभा युवा कार्याध्यक्षपदी आनंदा चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 15:21 IST