शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन करून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 7:49 PM

पाचोरा : लोहटार येथील घटना, जीवनाला कंटाळून आम्ही आत्महत्या करतोय...

पाचोरा (जि.जळगाव) : जीवनाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरी विषारी द्रव घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोहटार ता.पाचोरा येथे घडली. विष घेतल्यानंतर यातील आजोबांनी पोलिसांना फोन करून आम्ही दोघे आत्महत्या करीत असल्याचे कळविले होते. सेवानिवृत्त एसटी कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (७८) आणि प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) अशी या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. शनिवार, दि. ८ रोजी भल्या पहाटे या वृद्ध दाम्पत्याने विषारी द्रव घेतले. यानंतर, काही वेळातच ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलिसांना आम्ही जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, असा फोन केला.

पाचोरा पोलिसांचे पथक लगेच लोहटार येथे पोहोचले आणि या वृद्ध दाम्पत्यास ताब्यात घेत, खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचारास त्यांनी दोन दिवस प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी भल्या पहाटे प्रमिलाबाई यांचा, तर सकाळी ८च्या सुमारास ईश्वर पाटील यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नीचा एकाच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आम्ही जीवनास कंटाळून आत्महत्या करीत आहोत, यास कोणालाही दोषी धरू नये, अशी ईश्वर पाटील यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.प्रकाश पाटील हे करीत आहेत. या दाम्पत्यास दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक