शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By विजय.सैतवाल | Updated: September 12, 2024 00:47 IST

ही धक्कादायक घटना बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

जळगाव : दोन दिवसांपूर्वीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहमध्ये दाखल झालेल्या प्रतीक विजयराव गोरडे (१९, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) या विद्यार्थ्याने खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला प्रतीक गोरडे विद्यापीठामध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमांक तीन येथे खोली क्रमांक टी ४४७ मध्ये दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी राहतात. बुधवारी (११ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात गणपतीची आरती केली. त्यानंतर जेवण केले. काही वेळानंतर विद्यार्थी वस्तीगृहातील खोलीकडे परतले त्यावेळी प्रतीकच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. काही जणांनी खिडकीचा काच फोडून पाहिले तर प्रतीकने गळफास घेतलेला होता. विद्यार्थ्यांनी त्याला खाली उतरवून विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेतून  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

 विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

मुलाला सोडताना आई-वडिलांना अश्रू अनावर दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात प्रतीकला सोडण्यासाठी त्याचे आई-वडीलदेखील आले होते. मुलाला येथे पोहोचवल्यानंतर परतत असताना त्यांना व प्रतीकलादेखील अश्रू अनावर झाले होते. आई-वडील घरी जाऊन दोन दिवस होत नाही तोच विद्यार्थ्याने आपले जीवन संपविले. 

सकाळी साहित्य खरेदी विद्यापीठातील वस्तीगृहाच्या खोलीमध्ये राहण्यासाठी प्रतीकने बुधवारी सकाळी गादी व इतर साहित्य खरेदी केल्याची माहिती मिळाली. दिवसभर सर्व व्यवस्थित असताना रात्री त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला हे समजू शकले नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थी