अमळनेरच्या मुलाचे चार लाखांसाठी अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:32 IST2018-10-23T01:31:31+5:302018-10-23T01:32:18+5:30

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे चार लाख रुपयांसाठी दसऱ्याच्या दिवशी १८ रोजी दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली.

Amalner's son kidnapped for four lakhs | अमळनेरच्या मुलाचे चार लाखांसाठी अपहरण

अमळनेरच्या मुलाचे चार लाखांसाठी अपहरण

ठळक मुद्देमुलासह तिघे आले होते जीपनेअमळनेरातून तिघे पुण्याकडे निघाले अन् पुढे मात्र मुलगा पोहोचलेच नाही

अमळनेर, जि.जळगाव : शहरातील ताडेपुरा भागातील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे चार लाख रुपयांसाठी दसऱ्याच्या दिवशी १८ रोजी दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली.
अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेला आकाश राजू धनगर उर्फ अजय (वय १८) हा वडिलांसह पुण्याला शिक्रापूर चौफुली ता शिरूर येथे कामानिमित्त राहतो. तो तेथील हॉटेल राजयोगचे मालक व आचारी यांच्यासोबत दसºयाला अमळनेर येथे जीपने मंगल ग्रह मंदिरावर आला होता. एक दिवस अमळनेरला काका व आत्याकडे राहून १९ तारखेला सकाळी सातला तिघे हसत खेळत निघून गेले. नंतर २१ रोजी पाटील नावाच्या माणसाने मुलाच्या वडिलांना फोन केला की, तुमच्या मुलाने माझ्याकडून तीन लाख व ३४ ग्रॅम सोन्याची चैन अशा सुमारे चार लाखांच्या वस्तू घेतल्या आहेत, त्या दिल्या नाहीत तर तुमच्या मुलाला सोडणार नाहीत, असे सांगितल्याची तोंडी तक्रार मुलांच्या वडिलांनी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना केली.
दरम्यान, बडगुजर यांनी ठाणे अमलदारास शून्य नंबरने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असून २२ रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.


 

Web Title: Amalner's son kidnapped for four lakhs