शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अमळनेरच्या ‘राजश्री’ने उभे केले शून्यातून विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:27 IST

राजश्री पाटील (रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. घटस्फोटानंतर त्यांनी महिलांसाठी एका सेवाभावी संस्थेची उभारणी केली.

ठळक मुद्देआधुनिक नवदुर्गेचा खचलेल्या महिलांसाठी आधारयशदा येथे देताहेत विविध विषयांचे प्रशिक्षणश्रम व रोजगार मंत्रालयातर्फे झाला गौरव

रवि मोरे ।अमळनेर : ‘शून्यातून विश्व निर्माण करणे..’ ही म्हण ऐकीवात आहे. मात्र याची प्रचिती क्वचितच बघावयास मिळते. हुंड्यासाठी सासरी होणारा छळ त्यातच नवऱ्याकडून एक नव्हे, दोन नव्हे तर तीनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्न यातून स्वत:ला सावरत राजश्री पाटील (रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे.घटस्फोटानंतर त्यांनी महिलांसाठी एका सेवाभावी संस्थेची उभारणी केली. संस्था आणि दंत्तोपंत ठेंगडी राष्टÑीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने खेड्यापाड्यात जाऊन विधवा, घटस्फोटीत महिलांना एकत्रित केले. शिवाय त्यांना रोजगार मिळून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून अनेक महिला बचत गट स्थापन करुन महिलांना संघटीत केले.विशेष म्हणजे इतर महिलांना सक्षम करण्याआधी त्या स्वत: सक्षम झाल्या. रडत न बसता त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातच समाजसेवेची आवड असल्याने सध्या समाजकार्याच्या उच्च पदवीचे शिक्षण घेत आहेत.राजश्री या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर यशदा (पुणे) येथे प्रशिक्षण घेऊन त्या उत्कृष्ट प्रशिक्षकही झाल्या. आजपर्यंत त्यांनी जळगाव, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आदी ठिकाणी वर्ग १, वर्ग २ च्या अधिकाºयांना माहिती अधिकार, पेसा कायदा, पंचायत राज आदी विविध विषयांवर प्रशिक्षित केले आहे. त्यांना १० वर्षाचा मुलगा आहे. भाऊ नसल्याने वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करुन मुलाचेही कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्टÑीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे राजश्री पाटील यांचा विशेष गौरवही करण्यात आला आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीAmalnerअमळनेरJalgaonजळगाव