अमळनेरात दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:50 IST2021-03-18T21:50:30+5:302021-03-18T21:50:57+5:30
फ्रेंड्स ऑटो कन्सल्टंटला दि. १८च्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास आग लागून दुकानात असलेल्या जुन्या ४ ते ५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

अमळनेरात दुकानाला आग
ठळक मुद्देपाच ते सहा लाखांचे नुकसान.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : येथील धुळे रस्त्यावरील डॉ. हेमंत कदम यांच्या दवाखान्याजवळील फ्रेंड्स ऑटो कन्सल्टंटला दि. १८च्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास आग लागली. दुकानात असलेल्या जुन्या ४ ते ५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
तसेच सुमारे दीड लाखाची रोकड व गाड्यांचे कागदपत्रे यासह विक्रीचे टरबूज व फळ असे सुमारे ५ ते ६ लाखांचे नुकसान झल्याचा अंदाज दुकानाचे मालक अल्ताप पिरन बागवान यांनी यावेळी व्यक्त केला आहे. बहुतेक शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला याबाबत नोंद केली आहे. तपास पो. कॉ. सुनील हटकर करीत आहे.