कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 03:39 PM2021-07-29T15:39:18+5:302021-07-29T15:39:54+5:30

माजी आमदार साहेबराव पाटील आणि नगर परिषदेने मदत केली.

Amalner rushed to the aid of the Konkan flood victims | कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावले

कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावले

Next


अमळनेर : कोकण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.
कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो जनावरे मृत्युमुखी पडले तर अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कोकणातील लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि नगरपरिषदेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, विक्रांत पाटील, सेनेचे शहरप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, सरपंच सुरेश पाटील, संजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

Web Title: Amalner rushed to the aid of the Konkan flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app