अमळनेर ‘राड्या’ला ‘लोकमत’ फेसबुक पेजवर लाखावर व्ह्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:56 IST2019-04-11T12:55:37+5:302019-04-11T12:56:21+5:30
राजकीय पक्षांनी आपापल्या फेसबुक पेजवरही ‘लोकमत’चा हा व्हिडिओ शेअर केला

अमळनेर ‘राड्या’ला ‘लोकमत’ फेसबुक पेजवर लाखावर व्ह्यूज
जळगाव : अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या मारहाण, धक्काबुक्कीच्या प्रकाराचे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ आॅनलाईनवर झळकले. काही क्षणात राज्यभरात हे वृत्त लाखो वाचकांनी ‘लोकमत’ आॅनलाईनवरच वाचले. या सोबतच मारहाणीचा हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून ‘लोकमत’ फेसबुक पेजवर झळकताच तीन तासात या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज् मिळाले. इतकेच नव्हे तर २ हजार ३५०हून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर्स केला तर ३ हजार ५०० पेक्षा जास्त लाईक्स् मिळून ९००पेक्षा जास्त जणांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.
विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांनी आपापल्या फेसबुक पेजवरही ‘लोकमत’चा हा व्हिडिओ शेअर केला आहे.