अमळनेर कृउबा उपसभापतीच्या घरी धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:15 IST2018-10-07T23:13:47+5:302018-10-07T23:15:44+5:30

अज्ञात चोरट्याने ३ ते ७ आॅक्टोबर दरम्यान घराचा कडी कोंडा तोडून घरातील सुमारे एक लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. .

Amalner Krueba Subassignment house brave burglary | अमळनेर कृउबा उपसभापतीच्या घरी धाडसी घरफोडी

अमळनेर कृउबा उपसभापतीच्या घरी धाडसी घरफोडी

ठळक मुद्देएक लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपासरविवारी सकाळी ७ वाजता झाली चोरीची घटना उघडश्वान पथक व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल

अमळनेर : अमळनेर बाजार समितीचे सभापती अनिल पाटील हे शस्त्रक्रिया झाली असल्याने पुणे येथे रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दाखल आहेत. त्यांचे धुळे रोडवरील क्रांतीनगर मधील घर बंद होते. अज्ञात चोरट्याने ३ ते ७ आॅक्टोबर दरम्यान घराचा कडी कोंडा तोडून घरातील दोन्ही मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून शिवाय दरवाजे तोडून ५० ग्रॅम वजनाच्या ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, १८ ग्रॅम वजनाच्या ३७ हजार रुपयांचा नेकलेस, २ हजार रुपयांच्या चांदीच्या साखळ्या,४७ हजार रुपये रोख व इतर वस्तू असा सुमारे एक लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. .
७ रोजी सकाळी ७ वाजता अनिल पाटील यांच्या स्नूषा श्रृती पाटील पुणे येथून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांना कळवले असता पोलीस निरीक्ष अनिल बडगुजर, सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक किशोर पाटील,विजय साळुंखे, प्रमोद बागडे, रवी पाटील, योगेश महाजन, योगेश पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ बोलावण्यात आले होते.

Web Title: Amalner Krueba Subassignment house brave burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.