सर्व संघटनांकडून अमळनेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:23 IST2020-12-08T14:22:23+5:302020-12-08T14:23:22+5:30

भारत बंद ला अमळनेरात उत्तम प्रतिसाद मिळाला.

Amalner off from all organizations | सर्व संघटनांकडून अमळनेर बंद

सर्व संघटनांकडून अमळनेर बंद

ठळक मुद्देबाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या धोरणाविरुद्ध शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, किसान मोर्चा व विविध संघटनेतर्फे अमळनेर बंद आंदोलन करण्यात आले.

बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्वच दुकाने बंद होती. सकाळी साडेनऊ वाजेला विजय मारुती मंदिराजवळ सर्व कार्यकर्ते जमले. त्यांनतर बंद रॅलीला सुरुवात झाली. आमदार अनिल पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे बी. के. सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, भारती गाला, किसान मोर्चाचे रमेश पाटील, प्रा. विश्वास पाटील, बन्सीलाल भागवत, इम्रान खाटीक, प्रताप शिंपी, मुख्तार खाटीक, शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील, गोविंदा बाविस्कर, अरुण देशमुख, भागवत पाटील, बाळू पाटील, अरुण शिंदे, गौरव पाटील हजर होते.

Web Title: Amalner off from all organizations