माजी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 08:55 PM2019-11-16T20:55:01+5:302019-11-16T20:55:38+5:30

माजी विद्यार्थी मेळावा : प्रा़ डॉ़ व्ही़एल़माहेश्वरी यांचे मत

Alumni should endeavor to provide scholarships, employment | माजी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावे

माजी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावे

Next

जळगाव- माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे मत विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे माजी संचालक प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केले़
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील १९९२-९४ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवा शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी डॉ.एस.टी.इंगळे, डॉ.सिमा जोशी, प्रा.राजेंद्र देशमुख, डॉ. सुभाष सोनवणे, डॉ.सुरेश टेकी, डॉ. अनिल डोंगरे, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार मंचावर उपस्थित होते. प्रा.डॉ.सिमा जोशी यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा देत अध्यापनातील आपले अनुभव कथन केले. डॉ.सुरेश टेकी यांनी कठोर परिश्रम, शिस्तबध्दता आणि सातत्य हे तीन गुण जीवनात यशस्वीतेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरुन न जाता लढाऊवृत्ती बाळगावी आणि माजी विद्यार्थ्यांचा आदर्श सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.

या मेळाव्यास दिलीप बॅर्नजी, दिवाकर पाटील, जयवंत धर्माधिकारी,जळगाव, महेश सोनवणे, मनिष पाटील, मनोज पाटील, नरेश पाटील, परिमलसिंग राजपूत, प्रशांत शर्मा, प्रशांत येवले, पुरुषोत्तम न्याती, राजशेखर कोल्हे, राकेश सोनी, रमाकांत कटीयार, सचिन बापट, संजय महाजन, शौरिन शाह, सुदेश फिरके, सुनील श्रीवास्तव, उमाकांत पावसे, विक्रमसिंग घोरपडे, विवेक पाठक, योगेश चांडक, हितेंद्र शिंदे आदी माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रशांत शर्मा यांनी केले तर आभार उमाकांत पावसे यांनी मानले़

 

 

Web Title: Alumni should endeavor to provide scholarships, employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.