महिंदळे, ता भडगाव, जि.जळगाव : येथील कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिरात सन १९८९ ते २००२ या शैक्षणिक वर्षात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील होते. प्रमुख पाहुणे सरपंच अलकाबाई खैरनार, शाळेचे प्रथम व माजी मुख्याध्यापक विजय सुदाम नेरपगार, आमळदे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर.वळखंडे, एल.बी.पाटील होते.यावेळी संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरव केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती , शिक्षकाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व आपण ज्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे गेलो. आपण या शाळेचे देणं लागतो म्हणून शाळा डिजिटल करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्धार माजी विद्यार्थी रामधन परदेशी, प्रकाश पाटील, प्रतिभा जैन , सुनीता सावकारे, देवीदास पाटील, डॉ.रामसिंग परदेशी, रवी सावकारे, डॉ. समाधान पाटील, विजेंद्र भदाणे यांनी यावेळी केला. यावेळी माजी शिक्षक अशोक पाटील, एस.एन.पाटील, एन.जी.पाटील यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.पी.बागूल यांनी, सूत्रसंचालन डी.डी.पाटील यांनी, तर आभार प्रणीण पाटील व नीलेश अहिरे यांनी मानले.
भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:33 IST
महिंदळे येथील कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिरात सन १९८९ ते २००२ या शैक्षणिक वर्षात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्यांनी दिला गत स्मृतींना उजाळास्मृतीचिन्ह व ट्रॉफी देऊन माजी विद्यार्थ्यांचा सन्मानशाळेचे देणं लागतो म्हणून शाळा डिजिटल करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्धार