जळगावातून मुंबई पाठोपाठ आता पुणे विमानसेवेसाठीही प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:31 PM2018-01-07T12:31:36+5:302018-01-07T12:34:33+5:30

जिल्हाधिकारी

Also tried to get the Pune flight | जळगावातून मुंबई पाठोपाठ आता पुणे विमानसेवेसाठीही प्रयत्न

जळगावातून मुंबई पाठोपाठ आता पुणे विमानसेवेसाठीही प्रयत्न

Next
ठळक मुद्दे कंपनीच्या अधिका-यांशी चर्चा  भुसावळ ते पुणे रेल्वे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07- उडाण योजनेतंर्गत जळगाव मुंबई विमानसेवा सुरू झाली असून ती सुरळीत सुरू राहण्याचा प्रयत्न आहे. आता मुंबई पाठोपाठ जळगावातून पुण्यासाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून यासंदर्भात एअर डेक्कन कंपनीच्या अधिका:यांशी चर्चा केल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. 
पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी विमानसेवा तसेच रेल्वे, जिल्ह्यातील विविध योजना, कृषी योजना, कजर्माफी तसेच पतसंस्थांच्या प्रश्नांवर त्यांनी माहिती दिली. 
जळगावातून दररोज पुणे येथे 45 ते 46 बसेस जात असतात. पुण्यात जाणा:यांची संख्या पाहता येथून मुंबई प्रमाणे पुणे विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्त राहणार असल्याचे ते म्हणाले. 

 भुसावळ ते पुणे रेल्वे
 दररोज संध्याकाळी भुसावळ ते पुणे दरम्यान रेल्वे सुरू करण्याचा मनोदय   त्यांनी व्यक्त केला. मनमाड- अहमदनगर मार्गे ही रेल्वे राहणार असल्याचे ते म्हणाले. 

शेततळ्य़ांमध्ये जळगाव जिल्हा अव्वल
जिल्ह्याला 2 हजार शेततळ्यांचा उद्दीष्ट देण्यात आले होते,  यापैकी 1709  शेततळी पूर्ण झाले असून यासाठी 8 कोटी 26 लाख रुपयांचे अनुदान शेतक:यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. शेततळी पूर्ण करण्याच्या कामात जळगाव जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर.

शेतक:यांच्या खात्यावर 535.85  कोटी रुपये जमा
शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 577 शेतकरी कुटूबांनी कर्जमाफीसाठी 968   केंद्रांवर ऑनलाईन अर्ज भरल होते. त्यापैकी 1 लाख 68 हजार 792 शेतक:यांच्या खात्यावर 535.85  कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली व 65 हजार शेतक:यांना एसएमएसद्वारे तसे कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. 
 
कृषि यांत्रिकीकरणामुळे उत्पन्नात वाढ
कृषि यांत्रिकीकरण प्रकल्प व फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टर व कृषि अवजारांसाठी 6 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यात 272  ट्रॅक्टर व 428  शेती अवजारांचे  वाटप करण्यात आले. यामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याचे जिल्हाधिका:यांनी सांगितले.   यावर 4 कोटी 70 लाख रुपये खर्च झाला असून या योजनेस  वाढता प्रतिसाद पाहता 3 कोटी 11 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

31 हजार 322 हेक्टर क्षेत्रावरील गुलाबी बोंडअळीचे पंचनामे पूर्ण  
जिल्ह्यात 2 लाख 56 हजार 440 हेक्टर क्षेत्रासाठी 2 लाख 77 हजार 689 शेतक:यांच्या तक्रारी आल्या असून यापैकी 33 हजार 453  शेतक:यांच्या 31 हजार 322 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.

पाणी पातळीत 1.6 मीटने   वाढ 

2015-16मध्ये 232 गावांची  निवड करण्यात येऊन यासाठी 127 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. या गावांमध्ये 7404 कामे पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात 36118  टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यामुळे 58667  हेक्टर क्षेत्राला पाण्याचे आवर्तन देता येणार आहे. 2016-17 मध्ये 222 गावांची निवड करण्यात येऊन यासाठी 146 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 4856  कामांचा समावेश असून यापैकी 4402 कामे पूर्ण झाली आहे. तर 460 कामे प्रगतीपथावर आहे. यासाठी 131 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यत 91.34  कोटी रुपये खर्च झाला असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.  2017-18 मध्ये 206 गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी 96 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. यापैकी 82.98  कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामधून 4343 कामे करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे या गावांची पाणी पातळी 1.6  मीटरने वाढल्याची माहिती त्यांनी दिली.   सूक्ष्म (ठिबक व तुषार) सिंचनात जळगाव जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे जिल्हाधिका:यांनी सांगून  जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात शाश्वत सिंचन निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

 सौर उर्जाद्वारे विद्युतीकरण
अंबापाणी येथील 123, चारमळी येथील 30, रुईखेडा येथील 23 घरांचे 68.25 रुपये खर्च करुन सौर उर्जाद्वारे विद्युतीकरण करण्यात आले.

जिल्ह्यातील एक महानगरपालिका, 14 नगरपालिका, 3 नगरपंचायतीसाठी 46196  घरकुलांचा लक्षांक देण्यात आला असून 12461 झोपडय़ांचे नंबरींग पूर्ण झाले आहे. यात  352 घरांचा 18.39 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केला असून 156 घरांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे तर मेहरुण व पिंप्राळे शिवारात 1100 घरकुले बांधण्याचा प्रस्ताव आहे.

 मार्च अखेर जिल्हा हागणदारीमुक्त
जिल्ह्यात 1149 ग्रामपंचायती असून त्यापैकी 546 ग्रामपंचायती संपूर्ण हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या असून  मार्च अखेर उर्वरित ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.  जिल्ह्यात 3 लाख 47 हजार 728 कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय असून उर्वरित 1 लाख 40 हजार 219 शौचालये बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

पोलीस विभागाच्या नऊ सेवा ऑनलाईन -   पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे

शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.  नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सिटीझन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे नागरीकांना तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता भासणार नाही तर नागरीक ऑनलाईन तक्रार करु शकतात. गुन्हे रोखण्यासाठी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस विभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तसेच सेवा हमी कायद्यातंर्गत पोलीस विभागातर्फे नागरीकांना देण्यात येण:या विविध सेवांपैकी 9 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यासाठी नागरीकांना आता पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता भासणार नसल्याचेही   कराळे यांनी सांगितले.

महत्त्वाचे निर्णय
-  ठेवींदाराच्या प्रश्नाबाबत पुढील महिन्यांपासून धडक मोहिम राबविणार

- जिल्ह्यातील तरुणांचे कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देणार.

-  जळगाव, भुसावळ, चाळीसगाव येथे कृषी, डाळ, प्लॅस्टिक व चटई उद्योग वाढण्यासाठी प्रय}.

- जामनेर टेक्सटाईल पार्कसाठी जमिनीचा ताबा एमआयडीसीकडे देण्यात आला.
 
-     संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.  
 -  नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर पुरविण्यात आले आहे.
-   कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उभारणे
-   शेंदुर्णी येथे प्रादेशिक पर्यटनातंर्गत परिसरात विकास कामे करणे
-   कोथळी येथील संत मुक्ताई मंदिराचा जिर्णोद्वार करणे
- मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक विद्याथ्र्यांसाठी तंत्रनिकेतन विद्यालय बांधणे

Web Title: Also tried to get the Pune flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.