शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या ‘जखमा’ खान्देशातही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:48 IST

महाराष्टवर हल्ला करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला मुस्लिम शासक होता. त्यानेच देवगिरी साम्राज्यावर आक्रमण करून, तो अभेद्य किल्ला जिंकला होता. त्याच अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या जखमा या खान्देशात देखील आजही कायम आहेत.

ठळक मुद्दे१२९७ मध्ये गवळी राजाचा केला होता पराभवशहादा परिसरातील सुल्तानपुरातही केली होती लूटगायवाड्याचे आजही अस्तित्व कायम

- अजय पाटील

जळगाव :  सध्या ‘पद्मावत’ चित्रपटामुळे राणी पद्मावती, चित्तोडचा राजा रावलरतन सिंह व दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी नागरिक व इतिहासप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत  आहे. महाराष्टÑावर हल्ला करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला मुस्लिम शासक होता. त्यानेच देवगिरी साम्राज्यावर आक्रमण करून, तो  अभेद्य किल्ला जिंकला होता. त्याच अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणाच्या जखमा या खान्देशात देखील आजही कायम आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सातपुडापर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मनुदेवी मंदिर परिसरात असलेला ‘गायवाडा’ हा अल्लाउद्दीन खिल्जी व त्याचा सेनापती मलीक गफुरच्या आक्रमणाच्या जखमा घेवून, शेवटच्या घटका मोजत आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादापासून १० कि.मी.अंतरावर असलेल्या सुल्तानपुर येथे देखील अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याने प्रचंड लुट करून जैन राजाचा पराभव केला असल्याचा उल्लेख इतिहासात आहे. देवगिरी किल्ल्यावर आक्रमण करायला येत असताना,  अल्लाउद्दीन खिल्जीने खान्देशात लुट केली होती की, देवगिरी जिंकून ही लुट केली याबाबत इतिहासात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

गायवाड्याचे आजही अस्तित्व कायम१. सातपुडा परिसरात असलेल्या मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात ईश्वरसेन गवळी यांनी १२४८ ते १२५२ दरम्यान गायवाडा किल्ला बांधला होता. गोपालक असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गायी असल्याने या किल्लयाचे नाव ‘गायवाडा’ ठेवण्यात आले होते. अल्लाउद्दीन खिल्जी हा दिल्लीचा सुल्तान जल्लालुद्दीन यांचा जावई व त्यांच्या सेनापती होता.२.बिहारमधील कारा या ठिकाणाहुन जल्लालुद्दीन यांना न सांगताच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरी किल्लयावर ८ हजार भरवश्याचे सैनिक घेवून हल्ला केला होता. त्यापुर्वी जे-जे लहान राज्य त्यांच्या मार्गात आले, त्यात त्याने प्रचंड लुट केली. १२९७ च्या काळात अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती व खास विश्वासु असलेला मलीक गफुर याने संपत्ती व रसदसाठी गायवाडा येथे हल्ला केला. सैन्यशक्ती कमी असल्याने गवळी राजांचा त्यावेळी पराभव झाला होता.३. खिल्जी व मलीक गफुरच्या आक्रमणानंतर गवळी साम्राज्य लयास गेले. मात्र, आजही मनुदेवी मंदिराच्या वरच्या भागात  असलेल्या पहाडवर गायवाडा व गवळी राजाच्या किल्लयाचे अस्तित्व आजही दिसून येते. काही तुटलेल्या भिंती, ढासळलेले बुरुज आजही गायवाड्याचा इतिहास सांगतात. अनेक इतिहासप्रेमी, गिरीप्रेमी या ठिकाणी भेट देत असतात.

सुल्तानपुरातही केली होती प्रचंड लूटबिहार व मध्यप्रदेशातील कारा येथून येताना विंध्य पर्वत ओलांडून नंदुरबार जिल्'ातील सुल्तान पुरात प्रवेश केला होता. असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. त्या ठिकाणी सुल्तानपुरचे नाव वेगळे होते. सुल्तानपुर पुरगन्यात तेव्हा एका जैन राजाचे राज्य होते. त्या ठिकाणी देखील खिल्जीच्या आदेशाने मलीक गफुरने आक्रमण करून लुट केली होती. या ठिकाणाहूनच त्याने देवगिरीकडे कुच केली असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. त्याचा आक्रमणाच्या कोणताही पुरावा आज सुल्तानपुर मध्ये दिसून येत नाही. मात्र खिल्जी जेव्हा महाराष्टÑात आला, तेव्हा त्याचा सामना खान्देशातील राजांनीच केला असल्याचे दिसून येत आहे.

देवगिरी किल्ला जिंकल्यानंतर येथील राजाने खिल्जीला वार्षिक खंडणी द्यावयाचा करार करण्यात आला. मात्र एका वर्षी देवगिरीच्या राजाने खंडणी देण्यास नकार दिल्याने मलीक गफुरने देवगिरीवर पुन्हा हल्ला केला होता. त्याचवेळी गफुरने गवळी राजाच्या किल्लयावर हल्ला करुन त्या ठिकाणी लुट केली होती.-रामचंद्र पाटील, इतिहास अभ्यासक

मध्यप्रदेशमधुन अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीवर हल्ला करण्याआधी त्याचा सेनापती मलीक गफुरला आदेश देवून, काही भाग लुटला होता. त्याचवेळी शहादापासून १० किमी असलेल्या सुल्तानपुरवर हल्ला केला होता. त्यावेळी सुल्तानपुरचे वेगळे नाव होते. गफुरने हा भाग जिंकल्यानंतर त्याचे नाव सुल्तानपुर असे दिले आहे.-सर्जेराव भामरे, इतिहास अभ्यासक

टॅग्स :JalgaonजळगावPadmavatपद्मावत