भोरटेक येथे माजी सरपंचास सर्वपक्षीय श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:40+5:302021-09-19T04:16:40+5:30
कळमसरे, ता. अमळनेर : येथून जवळच असलेल्या भोरटेक (स्टेशन) गावाचे तब्बल ३० वर्षे सरपंचपद भूषविलेल्या व दुर्दैवाने कोरोनामुळे निधन ...

भोरटेक येथे माजी सरपंचास सर्वपक्षीय श्रद्धांजली
कळमसरे, ता. अमळनेर : येथून जवळच असलेल्या भोरटेक (स्टेशन) गावाचे तब्बल ३० वर्षे सरपंचपद भूषविलेल्या व दुर्दैवाने कोरोनामुळे निधन पावलेले दिलीपसिंग अजबसिंग राजपूत यांना त्यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. जि.प.चे माजी सदस्य शांताराम पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भोरटेकसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर, गृहिणींनीदेखील दिलीपसिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचा अनुभव कथन केला.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरिष चौधरी, स्मिता वाघ, साहेबराव पाटील, बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमा पाटील, भाजपच्या ॲड. ललिता पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सुभाष भांडारकर, कळमसऱ्याचे उपसरपंच जितेंद्रसिंग राजपूत, जी.टी. टाक, दोधवदचे ॲड. परमार, धारचे सरपंच सैंदाणे, जि.प., पं.स. सभापती, सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर्स परिसरातील सरपंच आदी उपस्थित होते. दिलीपसिंग राजपूत परिवारातील सदस्यांनी उपस्थितांप्रति आभार मानले.