धरणगाव येथे भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:38+5:302021-07-28T04:16:38+5:30
धरणगाव : येथील पद्मालय नगरात प्रा. मंगेश प्रल्हाद पाटील यांचे घर बंद पाहून काही अज्ञात चोरट्यांनी चोरी केली व ...

धरणगाव येथे भरदिवसा घरफोडी
धरणगाव : येथील पद्मालय नगरात प्रा. मंगेश प्रल्हाद पाटील यांचे घर बंद पाहून काही अज्ञात चोरट्यांनी चोरी केली व पाच हजार रुपये लंपास केले.
ही घटना २६ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली प्रा. पाटील हे सकाळी १० वाजेला कॉलेजला गेले होते. तर त्यांची आई गावाला गेली असताना भरदुपारी घरी कोणी नसताना फेरीवाले व अज्ञात चोरटे यांनी घर बंद पाहून दुपारी घर फोडले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले.
मंगेश पाटील हे कॉलेजमधून घरी परत आल्यावर त्यांनी घर उघडे पाहिले. घरात त्यांना सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, कपाट उघडे दिसले, कपडे इकडे तिकडे पडलेले दिसले. तर कपाटातील पाच हजारांपर्यंतची रोकड गायब होती.
याबाबत त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहे.
28 एचएसके ०६
कपाटातील अस्ताव्यस्त केलेले सामान
(छाया : आर. डी. महाजन)
270721\img-20210727-wa0008.jpg
फोटो कॅप्शन घरात कपाटाचे कुलूप तोडून झालेली चोरी व अस्ताव्यस्त सामान.
छाया. आर डी महाजन