जामनेरजवळ अपघातात अकोल्याची महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:20 IST2021-01-13T14:19:19+5:302021-01-13T14:20:47+5:30
बोदवड रस्त्यावरील वडिकील्ला घाटाजवळील वळणावर चारचाकी वाहन पलटल्याने अकोला येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

जामनेरजवळ अपघातात अकोल्याची महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : बोदवड रस्त्यावरील वडिकील्ला घाटाजवळील वळणावर चारचाकी वाहन पलटल्याने अकोला येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे दहाचे सुमारास घडली. वाहनातील तिघे जखमी आहे. जामनेर येथील नातेवाईकांच्या अंतयात्रेत सहभागी होण्यासाठी अकोला येथून येत असलेल्या वाहनास हा अपघात झाला.
अबेदाबी शेख इसाक (५५) हा मयत असून जामिल्खान नावाजखान (५५), शेख सुभान शेख मेहबूब (५८) व जाहिदाबी अब्रार अहमद (सर्व अकोला) अशी जखमींची नावे आहे. अपघातची माहिती मिळताच सर्वाना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी अबेदाबी यांना मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरु आहे.