अकोला मिडटाऊन संघाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:01+5:302021-02-05T05:53:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित रोटरी प्रिमीयर लीगच्या अंतिम सामन्यात अकोला मिडटाऊन रॉयल ...

अकोला मिडटाऊन संघाला विजेतेपद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित रोटरी प्रिमीयर लीगच्या अंतिम सामन्यात अकोला मिडटाऊन रॉयल संघाने पाच धावांनी स्टार्स वॉरियर्स संघाला पराभूत करत विजेतेपद मिळवले आहे.
सागर पार्कवर झालेल्या स्पर्धेत अकोला मिडटाऊन रॉयल संघाने स्टार्स वॉरियर्सला अंतिम चेंडूवर रोखत पाच धावांनी सामना जिंकला. तत्पूर्वी सकाळी उपउपांत्य सामन्यात वेस्ट एसपीसीसी संघाने आरसी डॉर्क हॉर्सेस संघाला १० गड्यांनी पराभूत केले. वेस्ट रॉयल किंग्स् संघाने ३८ धावांनी ईस्ट कंमांडोवर विजय मिळवला. तर अकोला मिडटाऊन रॉयल संघाने वेस्ट थंडर्सवर ३५ धावांनी मात केली. स्टार्स वॉरियर्सने नाशिक एव्हरशाईन संघाला ७५ धावांनी पराभूत केले. या सामन्यात रोहीत तलरेजाने शानदार शतक झळकावले.
उपांत्य सामन्यात वेस्ट रॉयल किंर्ग्स संघाला अकोला मिडटाऊन रॉयल संघाने पराभुत केले. स्टार्स वॉरियर्स संघाने वेस्ट एसपीसीसी संघावर १५ धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात प्रथमेश सैनी, रविंद्र छाजेड, ब्रिजेश ठाकूर (अकोला), रोहित तलरेजा, नितेश पंडित (अकोला), रोहित तलरेजा ‘मॅन ऑफ दि मॅच’ चे मानकरी ठरले. मॅन ऑफ द सिरिजचा बहुमान रोहित तलरेजा यांना आणि बेस्ट फलंदाज म्हणून रविंद्र छाजेड तर बेस्ट गोलंदाज सचिन बेहेडे यांना सन्मान प्राप्त झाला.
पारितोषिक वितरण प्रसंगी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर इलेक्ट आनंद झुनझुनवाला, रोटरी क्लब खामगावचे माजी अध्यक्ष अनिल गुप्ता, रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष रमण जाजू, अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, प्रोजेक्ट चेअरमन महेश सोनी, डॉ. राजेश पाटील, ललित मणियार, अतुल कोगटा उपस्थित होते.