अजित पवार यांचा अमळनेरात रोड शो

By संजय पाटील | Updated: June 16, 2023 11:26 IST2023-06-16T11:24:53+5:302023-06-16T11:26:18+5:30

मिरवणुकीच्या मागे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि  एकनाथ खडसे चारचाकी मधून येत होते.

ajit pawar road show in amalner | अजित पवार यांचा अमळनेरात रोड शो

अजित पवार यांचा अमळनेरात रोड शो

संजय पाटील, अमळनेर (जि.जळगाव) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार अनिल पाटील यांनी शहरात शुक्रवारी सकाळी रोड शो केला.  मिरवणुकीच्या मागे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि  एकनाथ खडसे चारचाकी मधून येत होते.

आमदार  पाटील यांच्या निवासस्थानापासून  खुल्या जीपमध्ये बसून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या पुढे मोटरसायकल रॅली, महिलांचे ढोल पथक,  त्यांच्या मागे वारकरी पथक होते. शरद पवार आगे बढो,  देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो , एकच वादा अजित दादा , जयंत पाटील साहेब आगे बढो , एकच वादा अनिल दादा आदी घोषणा देण्यात आल्या.  मिरवणूक अरिहंत चौक, तहसील कार्यालय ,महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ पोहचली. यावेळी  रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: ajit pawar road show in amalner