विज पुरवठा सुरळीत केल्यानंतर रात्री आठपर्यंत चालले कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:54+5:302021-07-31T04:17:54+5:30
आरटीओ कार्यालयाकडे महावितरणचे जून अखेर ७४ हजार ९७० रूपये व सितना चोरवड येथील १६ हजार ४१० असे वीजबिल थकीत ...

विज पुरवठा सुरळीत केल्यानंतर रात्री आठपर्यंत चालले कामकाज
आरटीओ कार्यालयाकडे महावितरणचे जून अखेर ७४ हजार ९७० रूपये व सितना चोरवड येथील १६ हजार ४१० असे वीजबिल थकीत होते. हे विजबिल भरण्याबाबत महावितरणने दोन वेळा नोटीस बजावूनही आरटीओ कार्यालयाने बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने थेट आरटीओ कार्यालयाचा विज पुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयातील सकाळी ११ पासून लर्निंग लायसन्स साठी परीक्षा घेण्यासह व इतर सर्व तांत्रिक काम बंद पडले होते. विशेष म्हणजे यामुळे जिल्ह्यातुन विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. या प्रकारानंतर आरटीओने महावितरणला विनंती पत्र दिल्यानंतर महावितरणने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरटीओचा विजपुरवठा सुरळीत केला.
इन्फो :
शासनाकडून अनुदान प्राप्त
परिवहन विभागातर्फे जळगाव आरटीओ विभागाला मागणी केलेले १ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. शक्य झाल्यास शनिवारी किंवा सोमवार पर्यंत महावितरणचे विजबिल भरण्यात येणार असल्याचे श्याम लोही यांनी सांगितले.